Current affairs 2026 || चालू घडामोडी 2026

▪️चालू घडामोडींवर आधारित आजचे महत्वपूर्ण 11 प्रश्नोत्तरे
① भारतातील पहिले सरकारी AI-सक्षम विद्यापीठ कुठे सुरू करण्यात आले आहे?➡️ मेरठ, उत्तर प्रदेश
② कोणत्या विद्यापीठाला भारतातील पहिले सरकारी AI-सक्षम विद्यापीठ घोषित करण्यात आले आहे?➡️ चौधरी चरण सिंह विद्यापीठ (CCSU), मेरठ
③ २०२६ मध्ये सलग नवव्यांदा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणाऱ्या अर्थमंत्री कोण आहेत?➡️ निर्मला सीतारामन
④ भारतात सर्वाधिक वेळा केंद्रीय अर्थसंकल्प कोणी सादर केला आहे?➡️ मोरारजी देसाई – १० वेळा
⑤ भारताचा पहिला अर्थसंकल्प कधी आणि कोणी सादर केला?➡️ ७ एप्रिल १८६० – जेम्स विल्सन
⑥ स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प कोणी सादर केला?➡️ आर. के. षणमुखम् शेट्टी
⑦ राष्ट्रीय महिला आयोगाचा स्थापना दिवस कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला?➡️ ३१ जानेवारी १९९२
⑧ राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कोणत्या अधिनियमांतर्गत झाली?➡️ महिला आयोग अधिनियम, १९९०
⑨ राष्ट्रीय महिला आयोगाचे मुख्यालय कुठे आहे?➡️ नवी दिल्ली
⑩ राष्ट्रीय महिला आयोगाच्या सध्याच्या अध्यक्षा कोण आहेत?➡️ विजया किशोर रहाटकर
⑪ राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्षा कोण होत्या?➡️ जयंती पटनायक